Thu, May 23, 2019 20:25
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वे स्थानकांवर बसविणार प्लास्टिक क्रशिंग मशीन

रेल्वे स्थानकांवर बसविणार प्लास्टिक क्रशिंग मशीन

Published On: Jun 29 2018 1:30AM | Last Updated: Jun 29 2018 1:08AMमुंबई : प्रतिनिधी

प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर सरकारकडून प्लास्टिक गोळा करून त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठीच आता मुंबईमधील रेल्वे स्थानकांवर प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन बसवण्यात येणार आहेत. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांमध्ये मिळून एकूण 60 मशीन बसवण्यात येणार आहेत. 

सुरुवातीला मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादर, घाटकोपर, कुर्ला, मुलुंड, ठाणे यांसह 17 स्थानकांवर प्रत्येकी दोन मशीन बसवण्यात येतील. तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, मुंबई सेंट्रल, चर्नी रोड, खार, दादर, विलेपार्ले, अंधेरी आणि बोरिवली यासह 25 स्थानकांवर प्रत्येकी 1 मशीन बसवण्यात येणार आहे. 

स्थानकावर असलेल्या फूड स्टॉलला लागूनच या मशीन बसवण्यात येतील. जेणेकरून पाणी प्यायल्यानंतर लगेच ती बाटली ग्राहकांना त्या मशीनमध्ये टाकता येईल. याचा रेल्वेला आणि स्थानकावर असलेल्या पाणी विकणार्‍या रेल नीर या कंपनीलासुद्धा फायदा होईल. रेल नीर हे केवळ स्थानकावरच प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी विकू शकते. काही दिवसांपूर्वी भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटी) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल आणि चर्चगेट या स्थानकांवर प्रायोगिक तत्त्वावर अशा मशीन बसविण्यात आल्या होत्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये अजून सुधारणा करून आता या मशीन इतर स्थानकांवर बसविण्यात येणार आहे.