Wed, Nov 21, 2018 18:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिक बंदी उद्योग व्यापार्‍यांच्या मुळावर येणार

प्लास्टिक बंदी उद्योग व्यापार्‍यांच्या मुळावर येणार

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 23 2018 1:45AMमुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने लादलेली प्लास्टिक बंदी ही उद्योग आणि व्यापार्‍यांच्या मुळावर येणारी आहे, असे प्रतिपादन ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशन (एआयपीएमए)ने केले आहे. कोणतीही सूचना न देता किंवा अधिसूचना न काढता प्लास्टिक बॅगा आणि प्लास्टिक उत्पादनांवर धाडी टाकून त्या जप्त करण्याची दडपशाही सुरू असून, बंदीमुळे अन्न, फार्मा, वैद्यकीय, वस्त्रोद्योग, रिटेल साखळी आदी उद्योगही काही प्रमाणात किंवा संपूर्णतः बंद होतील, असा इशाराही असोसिएशनने दिला आहे.

या बंदीमुळे या क्षेत्रातील उद्योग हे इतर राज्यांमध्ये जाणार असल्याने महाराष्ट्र आपल्या महासुलालाही मुकणार आहे. उद्योग बंद झाल्याने मोठ्या प्रमाणावर वस्तू आणि सेवा करांचे नुकसान होणार आहे. असा दावा ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्‍चर्स असोशिएशनच्यावतीने करण्यात आला आहे. 

थर्मोफार्मर्स अँड अलाईड इंडस्ट्रीज असोशिएशनचे अध्यक्ष हर्षित मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लास्टिक आणि थर्माकोलच्या जप्‍तीने सर्व व्यापारी सध्या  हवालदिल झाले आहेत. सरकारने सर्वसामान्यांना विनामुल्य कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अशाप्रकारची घोषणा म्हणजे एका उद्योगाला प्रोत्साहन देत असताना त्याचवेळी दुसर्‍या उद्योगाला दुय्यम वागणूक देण्याचा हा प्रकार आहे. अशा प्रकारच्या दुजाभावामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढणार असून एका भरभराटीवर असलेल्या उद्योगाला टाळे लागणार आहे.

Tags : Mumbai, Mumbai news, Plastic ban issue,