Sun, Aug 25, 2019 08:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निवडणूक फंडासाठी प्लास्टिकबंदी!

निवडणूक फंडासाठी प्लास्टिकबंदी!

Published On: Jun 27 2018 2:12AM | Last Updated: Jun 27 2018 1:57AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

लोकसभापाठोपाठ राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्लास्टिक बनवणार्‍या कंपन्यांकडून फंड मिळावा म्हणून प्लास्टिकबंदी केली असावी, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. महापालिका आणि राज्य सरकार स्वतःची कामे नीट करत नाहीत, तोपर्यंत कोणीही दंड देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागणीवरून सरकारने केलेल्या प्लास्टिकबंदीला राज यांनी विरोध केला होता. त्यावर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी, काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली, असा सवाल राज ठाकरेंना उद्देशून विचारला होता. त्या सवालाला राज यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, रामदास कदम यांनी नात्यांवर भाष्य करू नये, 

महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकदाही बोलले नाहीत. त्यामुळे हा निर्णय एका खात्याचा आहे की पूर्ण सरकारचा, सगळ्याच प्लास्टिकवर बंदी का नाही, असे सवाल राज यांनी उपस्थित केले. महाराष्ट्रातील प्रदूषित नद्यांच्या स्वच्छतेविषयी पर्यावरण मंत्री कदम बोलले होते. पण त्याचे पुढे काहीही झाले नाही तसेच प्लास्टिकबंदीचे होईल, असा दावाही राज यांनी केला.
राज ठाकरेंचा आरोप, दंड न देण्याचेही आवाहन

राजकडून मराठेंची पाठराखण

महाराष्ट्र सरकारच्या पीक विमा कर्ज योजनेची एकूण छाननी करणार्‍या कमिटीचे अध्यक्ष रवींद्र मराठे होते. गेल्या चार वर्षाच्या काळात ही योजना फसली असल्याचा अहवाल रवींद्र मराठेंनी दिला होता. त्याचा राग सरकारला असल्यामुळे डी.एस. कुलकर्णी कर्जप्रकरणाच्या आड मराठेंवर कारवाई केली असल्याचा आरोप राज यांनी केला. नोटबंदीच्या काळात जादा नोट बदलीप्रकरणी भाजपचे अध्यक्ष अमित शहांवर कारवाई नाही, चंदा कोचरवर कारवाई नाही. पण बँक ऑफ महाराष्ट्रच्या मराठेंवर कारवाई कशी होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.