Fri, Apr 26, 2019 10:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कारवाईचे अधिकार कुणाला?

कारवाईचे अधिकार कुणाला?

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 1:03AMमुंबई : प्रतिनिधी

महापालिका आयुक्त, उपायुक्त, शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट अधिकारी व निरीक्षक, अनुज्ञाप्ती निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य अधिकारी, प्रभाग अधिकारी किंवा आयुक्त यांनी नामनिर्देशित केलेला अधिकारी तसेच सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी व त्यांनी नामनिर्देशित केलेले अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य या नियमांतील सर्व तरतुदींची अंमलबजावणी पालिका क्षेत्रात करण्याचे अधिकार.

जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी व जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशित केलेले व इतर अधिकारी प्लास्टिक बंदीच्या नियमांतील तरतुदींची अंमलबजावणी करणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गट विकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी व ग्रामसेवक यांना त्यांच्या क्षेत्रात अधिकार राहतील.

सदस्य सचिव, प्रादेशिक अधिकारी, उप प्रादेशिक अधिकारी व क्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, संचालक पर्यावरण, संचालक आरोग्य सेवा, उप संचालक आरोग्य अधिकारी, संचालक प्राथमिक व उच्च शिक्षण, सर्व टूरिझम पोलीस, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, मोटर वाहन निरीक्षक, वाहतूक पोलीस, सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी, उपायुक्त, पुरवठा, जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व विक्रीकर अधिकारी व विक्रीकर निरीक्षक, वनक्षेत्रपाल, रेन्ज फॉरेस्ट ऑफिसर, जिल्हा वन अधिकारी किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेले अधिकारी, पोलीस पाटील यांना अधिकार देण्यात आले आहेत. 

कारवाईचा अतिरेक होणार नाही  : रामदास कदम

राज्यात प्लास्टिकनिर्मितीच पूर्णपणे बंद केली जाणार असल्याने सर्वसामान्यांना घाबरून जाण्याचे कारण नाही. प्लास्टिक बंदीचे उल्लंघन केल्यास आकारण्यात येणार्‍या दंडाच्या कारवाईचा अतिरेक होणार नाही, सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार नाही याची आपण स्वत: खबरदारी घेणार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. मात्र प्लास्टिक निर्माते, इतर राज्यांतून प्लास्टिकच्या वस्तू आणणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.