Mon, Nov 19, 2018 15:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिकबंदीवर शिक्‍कामोर्तब? 

प्लास्टिकबंदीवर शिक्‍कामोर्तब? 

Published On: Mar 16 2018 1:26AM | Last Updated: Mar 16 2018 1:25AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्यात पुन्हा एकदा प्लास्टिकबंदी होण्याची शक्यता आहे. प्लास्टिक पिशव्यांवर सरसकट बंदी घालताना प्लास्टिक प्लेट, चमचे आणि थर्माकोलच्या वस्तूंवरही बंदी घालण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याचे समजते. ही बंदी गुढीपाडव्यापासून लागू होऊ शकते.  

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बाटलीबंद पाणी विक्रीवरही बंदी येणार होती. मात्र, हा निर्णय होऊ शकला नव्हता. पिशव्यांबरोबरच प्लास्टिकच्या प्लेट, चमचे, थर्माकोलच्या प्लेट आदी वस्तूंवर बंदी येण्याचे संकेत आहेत. या संदर्भातील घोषणा शुक्रवारी विधिमंडळात होऊ शकते. त्यानंतर या संदर्भातील आदेश जारी केला जाणार असल्याचे समजते.