Sun, May 31, 2020 23:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात RPIला स्थान द्या : रामदास आठवले

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात RPI ला स्थान द्या : रामदास आठवले

Published On: Jun 12 2019 6:59PM | Last Updated: Jun 12 2019 6:59PM
मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद देऊन सन्मानाने स्थान द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आपल्याकडे जोरदार मागणी केली असून राज्यभरातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांची सत्ता सहभागाबद्दल अपेक्षा वाढल्या असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला पाच टक्के वाटा देण्याबाबत चर्चा झाली असून त्यानुसार राज्य सरकारमध्ये पन्नास कार्यकर्त्यांना महामंडळ आणि राज्यातील एका नेत्यास मंत्रिमंडळात स्थान द्यावे याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा केली होती. तसेच जाहीर आश्वासनही दिले होते. याची आठवण करून देऊन रामदास आठवलेंनी राज्यात मंत्रिमंडळ विस्तारत रिपाइंला स्थान देण्याची आग्रही मागणी केली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाने एकही जागा लढविली नव्हती तरी रिपाइं कार्यकर्त्यांनी भाजप शिवसेना युतीच्या सर्व उमेदवारांचा प्रत्येक मतदारसंघात घराघरात जाऊन प्रचार केला होता. त्यामुळे होऊ घातलेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंला स्थान द्यावे ही रिपाइं कार्यकर्त्यांची मागणी रास्त असून त्यासाठी आपण लवकरच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले आहे.