Fri, Jul 19, 2019 01:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रायगड : गणेश उत्‍सवापूर्वी खड्डे बुजवा : चंद्रकांत पाटील

रायगड : गणेश उत्‍सवापूर्वी खड्डे बुजवा : चंद्रकांत पाटील

Published On: Aug 31 2018 8:53AM | Last Updated: Aug 31 2018 8:53AMपनवेल : प्रतिनिधी 
गणेश उत्‍सवापूर्वी पनवेल-गोवा महामार्गावरील रस्‍त्यात पडलेले खड्डे बुजवावेत, असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या पाहणीसाठी मंत्री पाटील आज (३१ ऑगस्‍ट) सकाळी पनवेलमध्ये आले. त्यांनी येथील खड्ड्यांची पाहणी केली आणि शासकीय विश्रामगृह येथे बैठकीत अधिकार्‍यांना सूचना केल्या.
पनवेल-गोवा महामार्गावर खड्डे पडल्याने तो धोकादायक बनला होता. त्यातच गणेशोत्‍सव लवकरच सुरु होत असल्याने लोकांमध्ये खड्ड्यांवरून नाराजी होती. त्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणीसाठी आज सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी पनवेल गाठले. खड्ड्यांची पाहणी करून विश्रामगृह येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी ठेकेदार आणि महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांना खड्डे बुजवण्याच्या सूचना केल्या. 
फुलावर खर्च करू नका : चंद्रकांत पाटील
पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात बांधकाम विभाग आणि महामार्ग अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्‍वागत फुलगुच्छ देऊन केले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फुलावर खर्च करू नका, असे खर्च टाळा, असा सल्‍ला दिला.