Fri, Nov 16, 2018 05:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पेट्रोल पंपाची शौचालये सार्वजनिक  कशी ?

पेट्रोल पंपाची शौचालये सार्वजनिक  कशी ?

Published On: Mar 08 2018 1:48AM | Last Updated: Mar 08 2018 1:05AMमुंबई : प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियानच्या नावाखाली मुंबईतील पंट्रोल पंपांची शौचालये सार्वत्रिक करून सर्व सामान्यांसाठी खुली करणार्‍या महापालिकेला उच्च न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले. ही शौचालये सार्वत्रिक करण्याचा  पालिकेला कोणताच अधिकार नाही, असे स्पष्ट करून न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने पालिकेच्या आदेशाला स्थगिती देऊन पेट्रोल पंपधारकांना मोठा दिलासा दिला. या शौचालयावरील सार्वजनिक शौचालयाच्या पाट्या तात्काळ हटवा, असा आदेशही पालिकेला दिला.

स्वच्छ भारत अभियानच्या नावाखाली 22 डिसेंबर 2017 रोजी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने एका परिपत्रकाद्वारे  पेट्रोल पंपावरली शौचालये सार्वत्रिक करून सर्वसामान्यांसाठी खुली करून खुली करून दिली. तसे फलकही शौचालयांवर लावले. त्या विरोधात दक्षिण मुंबईसह गोरेगाव, घाटकोपर, मस्जिद बंदर सह विविध ठिकाणच्या 12  पेट्रोल पंप चालकांच्यावतीने जैन वेल्फेअर या संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेउन पालिकेच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली.