Thu, Sep 20, 2018 09:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चित्रपटगृहात खाद्यपदार्थ नेण्यास अखेर परवानगी

चित्रपटगृहात खाद्यपदार्थ नेण्यास अखेर परवानगी

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 2:00AMमुंबई : प्रतिनिधी 

चित्रपटगृहातील खाद्यपदार्थांचे दर कमी करा, अशी मागणी करत मनसेच्या चारकोप विधानसभेच्यावतीने चारकोपमधील तीन चित्रपटगृहांच्या व्यवस्थापनास देण्यात आले. निवेदन मिळताचं चित्रपटगृहात प्रेक्षकांना खाद्यपदार्थ व पाण्याची बाटली घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली.

रविवारी चारकोप विधानसभेच्यावतीने सिनेमॅक्स आणि मिलाप पी.व्ही.आर आणि रघुलीला आयनॉक्स या चित्रपटगृहांत (मल्टीप्लेक्स ) प्रेक्षकांना खाद्यपदार्थ आणि पाण्याची बाटली आणण्यापासून मज्जाव करू नका आणि चित्रपटगृहात विक्रीसाठी ठेवलेले खाद्यपदार्थ, पाण्याची बाटली, थंडपेय यांचे दर कमी करावे, असे पत्र देण्यात आल्यानंतर. तिन्ही चित्रपटगृहांच्या व्यवस्थापनाने माघार घेत प्रेक्षकांचा जाच बंद केला.