Mon, Jun 24, 2019 16:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपातास परवानगी

अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपातास परवानगी

Published On: Apr 10 2018 1:37AM | Last Updated: Apr 10 2018 1:09AMमुंबई : प्रतिनिधी

बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या तेरा वर्षाच्या मुलीच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम आणि गर्भधारणा कायम ठेवल्यास त्या मुलीच्या जीविताला होणारा धोका लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने या मुलीला गर्भपात करण्याची परवानगी दिली. गेल्यावर्षी 29 जुलै रोजी 23 वर्षांच्या तरुणाने पीडित मुलीचे तिच्या उल्हासनगरातील घरातून अपहरण केले होते़  नंतर दोघे उत्तर प्रदेशमध्ये सापडले होते़  पोलिसांनी मार्च 2018 रोजी आरोपी तरुणाला अटक केली आणि मुलीला मुंबईत परत आणले़. त्यानंतर ती गर्भवती असल्याचे उघड झाले.

मुंबईतील बचपन बचाव आदोलन या सेवाभावी संस्थेच्या मदतीने पीडित मुलीच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. याची दखल घेऊन न्यायालयाने जे़  जे़ हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने बलात्कार पीडितेची वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. जे़  जे़ हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने बलात्कार पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आणि गर्भधारणा कायम ठेवल्यास पीडितेच्या जिवीताला धोका निर्माण होऊ शकतो, असा निष्कर्ष काढला़  त्या निष्कर्षाची दखल घेऊन न्यायमूर्ती एऩ  एच़  पाटील आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने 24 आठवड्यांची गर्भवती असलेल्या बलात्कार पीडितेला गर्भपात करण्यास परवानगी दिली़.

Tags : Mumbai, Mumbai news, minor rape victim, abortion, Permission,