होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रो 3 च्या कामाला रात्रपाळीची परवानगी कठीणच

मेट्रो 3 च्या कामाला रात्रपाळीची परवानगी कठीणच

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 12:55AMमुंबई : प्रतिनिधी

डिसेंबर  2017 मध्ये  ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावर दक्षिण मुंबईत रात्रीच्यावेळी मेट्रोचे काम करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली असल्याने हे काम सुरू करण्यास परवानगी द्या, अशी विनंती  करणारा अर्ज मेट्रोने उच्च न्यायालयात दाखल केला आहे.  त्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. 

दक्षिण मुंबईत भुयारीकरणाचे काम कामासाठी वापरण्यात येणार्‍या मशीनमुळे होणार्‍या ध्वनी प्रदूषणाला पर्याय नाही. दिवसरात्र काम केल्याशिवाय ते पूर्ण होणार नाही.  ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावर कायद्याच्या चौकटीत बसणारा उपाय सुचवा  आणि  काम सुरू करा,  अशी अशी भूमिका उच्च न्यायालयाने घेतली आहे. याचिकेवर  29 जुलैला सुनावणी होणार आहे.

भुयारी मार्गासाठी वापरण्यात येत असलेल्या मशीनने  24 तास काम केल्याशिवाय पर्याय नाही. एकदा काम सुरू झाले की मध्येच थांबवता येणार नाही, त्यातून  निर्माण होणारे प्रचंड क्षमतेचे प्रेशर मध्येच सोडले तर जमिनीखालची माती ढासळून वरच्या इमारती कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा यावेळी अ‍ॅडव्होकट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी केला. अंधेरी सीप्झ ते कुलाबा या मेट्रोच्या  प्रकल्पासाठी दक्षिण मुंबईतील कफ परेड भागात  रात्रीच्यावेळी काम करण्यास परवानगी मिळणे यामुळे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.