अधिकची मदत, पीकविम्याचे पैसे द्या; भाजपची राज्यपालांकडे मागणी  

Last Updated: Nov 17 2019 4:44PM
Responsive image
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील


मुंबई : पुढारी ऑनलाईन

अवकाळी पावसाने राज्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत म्हणून तातडीची आर्थिक मदत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी जाहीर केले आहे. या निर्णयाचे स्वागत भाजपाने केले आहे. तसेच शेतकऱ्यांना अधिक मदतीची गरज असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन अधिक मदतीचा निर्णय घ्यावा अशीही मागणी भाजपने केली आहे. याबाबतची माहिती भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज रविवारी दिली.

नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खरीप  पिकांसाठी प्रती हेक्टर ८ हजार रुपये तर फळबागायती बारमाही पिकांसाठी प्रती हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शासनाकडून शेतकऱ्यांना दिली आहे. दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी ही मदत दिली जाईल. शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयातील परीक्षा शुल्क माफ करण्याचा तसेच आपद्ग्रस्त क्षेत्रात शेतसारा माफ करण्याचा निर्णयही राज्यपाल कोश्यारी यांनी जाहीर केला आहे.

भाजप महायुती सरकारने २३ हजार कोटी पीकविमेचा प्रिमीयम भरला आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत करण्यासाठी राज्यपालांनी पीक विमा कंपन्यांना पाचारण करावे, असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केले आहे. शेतकऱ्यांना अधिकच्या मदतीची गरज आहे. त्यानूसार राज्यपालांनी सरकारकडे पाठपुरावा करावा. अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.