Mon, Apr 22, 2019 16:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पवार, शेट्टी, पटेल, मेवानी, ठाकूर २६ रोजी एकत्र

पवार, शेट्टी, पटेल, मेवानी, ठाकूर २६ रोजी एकत्र

Published On: Jan 16 2018 2:13AM | Last Updated: Jan 16 2018 12:44AM

बुकमार्क करा
मुंबई : चंद्रशेखर माताडे

भारतीय घटनेचे संरक्षण करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येत आहेत. 26 जानेवारीला मुंबईत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून ही रॅली गेट व ऑफ इंडियासमोरील युगपुरुष  छत्रपती  शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करणार आहे. याच ठिकाणी दोन तास मौन पाळण्यात येणार आहे. हा कायर्र्क्रम जरी अराजकीय असला तरी त्यातून भविष्यकाळात नवी राजकीय आघाडी जन्माला येण्याची शक्यता आहे. 

2014 च्या निवडणुकीत भाजपबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडी केली होती. या संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी  नरेंद्र मोदी आले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजपमध्ये दरी पडली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात शेतकर्‍यांनी राज्याची संपाची हाक दिली होती. त्या संपातून मार्ग काढण्यासाठी ज्या हालचाली झाल्या त्यातून राजू शेट्टी काहीसे बाजूला पडले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेले सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्र्यांशी जवळीक वाढली. खोत यांनी शेट्टी यांनाच टीकेचे लक्ष्य केले. दुरावलेल्या राजकीय संबंधातून शेट्टी यांनी सरकारचा असलेला पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला. लोकसभेत एकमेव खासदार असलेल्या या पक्षाला राज्यात एक राज्यमंत्रिपद व त्याच दर्जाचे महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले. राज्यमंत्री खोत सरकारमध्ये राहिले व त्यांनी स्वत:ची शेतकरी संघटना स्थापन केली. तर यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.