Sun, Nov 18, 2018 09:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंदोलन थांबवून सहकार्य करा; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

आंदोलन थांबवून सहकार्य करा; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

Published On: Aug 09 2018 2:06AM | Last Updated: Aug 09 2018 1:37AMमुंबई : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासंदर्भात येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांनी आता आंदोलन स्थगित करून सरकारला कायदेशीर बाजू मांडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले. 

आरक्षणासंबंधीचा अहवाल लवकरात लवकर देण्याचे निर्देश राज्य मागासवर्ग आयोगाला द्यावेत, अशी विनंती सरकारने उच्च न्यायालयाला केली होती. त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाने न्यायालयात प्रतिज्ञापत्रही सादर केले. प्रतिज्ञापत्रासह आयोगाने आतापर्यंत केलेल्या कामाची माहितीही दिली आहे, असे पाटील म्हणाले.आयोगाने नमुना सर्वेक्षणासाठी पाच संस्थांची नेमणूक केली आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याचे या संस्थांनी आयोगाला कळविले आहे. आता या माहितीचे संकलन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे कालबद्ध कार्यक्रमानुसार मराठा आरक्षणाचा विषय सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे आंदोलकांनी शांतता राखावी आणि आत्महत्येचे पाऊल उचलू नये, असे ते म्हणाले.