Sat, Nov 17, 2018 14:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पवारांचीच नियत खोटी : पाशा पटेल

पवारांचीच नियत खोटी : पाशा पटेल

Published On: Jun 05 2018 1:37AM | Last Updated: Jun 05 2018 1:00AMमुंबई : खास प्रतिनिधी

सरकारची नियत खोटी असल्याने शेतकर्‍यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असा सल्ला देणार्‍या शरद पवारांचीच नियत खोटी आहे. दहा वर्षे देशाचे कृषिमंत्री असताना शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यापेक्षा क्रिकेटवर डोळा ठेवून आयपीएलमध्ये गुंतलेले शरद पवार आता सत्ता गेल्यावर वैफल्यातून शेतकर्‍यांना भडकावण्याचा घृणास्पद प्रकार करत आहेत, अशी खरमरीत टीका राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे.

शेतकर्‍यांच्या संपाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  दिलेल्या सल्ल्याचा पाशा पटेल यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. सध्याच्या सरकारची नियत कशी आहे, याचे मोजमाप करण्यापूर्वी शरद पवार यांनी आपण इतकी वर्षे शेतकर्‍यांच्या नावाने मते मिळवून सत्ता भोगली, तरी शेतकर्‍यांची अवस्था अशी का झाली याचे त्यांनी आधी उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.