Sun, May 19, 2019 14:40
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्वस्त घरांसाठी खासगी जमीनमालकांशी भागीदारी

स्वस्त घरांसाठी खासगी जमीनमालकांशी भागीदारी

Published On: Aug 08 2018 2:05AM | Last Updated: Aug 08 2018 1:55AMमुंबई : प्रतिनिधी

पंतप्रधान आवास योजनेतून राज्यात  आणखी  15 लाख घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.त्यापैकी 5 लाख 72 हजार घरांना केंद्राची मान्यता मिळाली आहे.या योजनेला गती देण्यासाठी खासगी जमीन मालकांना यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. या संयुक्त भागीदारी  धोरणाला मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील लोकांना यातून घरकुले मिळणार आहेत.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर), विकास योजना( डीपी) व महारेरातील तरतुदी लागू रहाणार आहेत. ज्यांच्या मालकीची जमीन आहे अशा खासगी व्यक्तींना या निर्णयाने म्हाडाबरोबर सहभाग घेता येणार आहे. हे घरबांधणी प्रकल्प सर्व महापालिका क्षेत्र तसेच मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद  व नागपूर महानगर विकास प्राधिकरण, सिडको, एमएसएसआरडीसी, नैना, एनआयटीच्या  कार्यक्षेत्रात राबविता येणार आहेत. 

राज्यात2022 सालापर्यंत  382 नागरी  क्षेत्रात 19 लाख 40 हजार घरकुले तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.त्यापैकी 5 लाख 72 हजार  286 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.