Wed, Apr 24, 2019 01:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पर्रिकर उपचारासाठी लिलावती रुग्णालयात

पर्रिकर उपचारासाठी लिलावती रुग्णालयात

Published On: Mar 06 2018 1:49AM | Last Updated: Mar 06 2018 1:28AMमुंबई :

सीएमओ गोवा या ट्विटर हँडलवरून मिळालेल्या माहितीनुसार गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी मुंबईला रवाना होतील असे सांगण्यात आले. शिवाय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पर्रिकर पुढील उपचारासाठी देशाबाहेर जाण्याची शक्यता असल्याची माहितीही देण्यात आली. पर्रिकर उपचारांसाठी अमेरिकेत रवाना होण्याची शक्यता आहे.

स्वादूपिंडाच्या विकाराने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली असली तरी त्यांनी आराम न करता घरातूनच कामाला सुरुवात केली आहे. घरातूनच त्यांनी सर्व फाईल्स क्लिअर करण्याचा धडाका लावला. दरम्यान, आरोग्य तपासणीसाठी त्यांना सोमवारी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे. पर्रिकर अनेक दिवसांपासून स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. याच पार्श्‍वभूमीवर गोव्यातील जीएमसी व त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी पर्रिकर यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना स्वादुपिंडाचा आजार असल्याचे निदान कऱण्यात आले होते. सोमवारी मुंबईत तपासणीसाठी यायचे असल्याने गेल्या दोन दिवसात त्यांनी काही महत्त्वाच्या बैठकी घेतल्या. तसेच काही महत्त्वाचे निर्णय घेऊन सहकार्‍यांवर जबाबदार्‍या सोपवल्याचे सूत्रांनी सांगितले.