होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अबू सालेमला लग्न करण्यासाठी नाकारला पॅरोल

अबू सालेमला लग्न करण्यासाठी नाकारला पॅरोल

Published On: Apr 22 2018 8:08AM | Last Updated: Apr 22 2018 1:28AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईत स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टनुसार सईद बहार कौसर ऊर्फ हिना हिच्याशी निकाह करण्यासाठी 45 दिवसांचा पॅरोल द्या, अशी मागणी करणारा गँगस्टर अबू सालेमचा अर्ज पोलीस प्रशासनाने फेटाळून लावला आहे. 

गेली बारा वर्षे तीन महिने आणि चौदा दिवस अबू सालेम तुरुंगात असून, या संपूर्ण काळात त्याला एकदाही रजा मिळालेली नाही. गेल्या 16 फेब्रुवारीला त्याने तळोजा तुरुंग प्रशासनाकडे लग्नासाठी पॅरोल मागणारा अर्ज केला होता. कोकणच्या विभागीय आयुक्‍तांकडे हा अर्ज त्याच्या संपूर्ण कुंडलीसह पाठवण्यात आला. आयुक्‍तांनी आपल्या शिफारशीसह सविस्तर अहवाल ठाणे पोलीस आयुक्‍तांना पाठवला आणि तेथून तो अधिक छाननीसाठी मुंब्रा पोलीस ठाण्यात गेला. या दरम्यान हिनाच्या कुटुंबीयांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. ठाणे पोलीस आयुक्‍तांचा अहवाल येताच कोकणच्या विभागीय आयुक्‍तांनी सालेमचा अर्ज तीन दिवसांपूर्वीच सालेमचा अर्ज फेटाळला. 

पॅरोलच्या काळात आपण मुंब्य्रात हिनाच्याच घरी राहणार असल्याचे सालेमने अर्जात म्हटले होते. त्यावर मोहम्मद सलीम अब्दुल रझ्झाक मेमन आणि मोहम्मद रफीक सय्यद यांची जामीनदार म्हणून नावे दिली होती. हिना हिची आई आणि रफीक सय्यद यांचे जबाब पोलिसांनी गुरुवार व शुक्रवारी नोंदवले. मुंबई ते लखनऊ प्रवासात 2014 साली हिनाने सालेमसोबत रेल्वे प्रवास केला आणि ती चर्चेत आली होती.  

Tags : Mumbai, Parole denied, marry, Abu Salem, Mumbai news,