Sun, Jul 21, 2019 12:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मैत्रिणीनेच मारला मैत्रिणीच्या घरी डल्‍ला...!

मैत्रिणीनेच मारला मैत्रिणीच्या घरी डल्‍ला...!

Published On: Aug 01 2018 6:40PM | Last Updated: Aug 01 2018 6:48PMपनवेल : प्रतिनिधी

मैत्रीच्या नावाला काळिमा फासणारी घटना तळोजा परिसरातील पाले बुद्रुक गावात घडली आहे. जिवाभावाच्या मैत्रिणीने आपल्या मैत्रिणीच्या घरात घुसून लाखो रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. तळोजा पोलिसांच्या पथकाने अगदी शिताफीने या मैत्रिणीला अटक करून गजाआड केले आहे. तब्बल 6 महिन्यानंतर या आरोपी महिलेला अटक करून तीच्याकडून जवळपास 30 तोळे सोने आणि 30 तोळे चांदी पोलिसांनी जप्त केली आहे.

वंदना बाविस्कर (रा. पाले बुद्रुक) असे पकडलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. वंदना ही भावना कदम यांची मैत्रीण आणि शेजारी राहणारी होती. 3 जानेवारी रोजी पाले बुद्रुक येथील रहिवाशी  भालचंद्र कदम यांच्या घरात भर दिवसा चोरी झाल्याची घटना घडली होती. या वेळी चोरट्यांनी घरातील लाखो रुपयांचा सोन्या चांदीच्या सामानावर डल्ला मारला होता. या मध्ये 50 तोळ्याहून अधिक दागिन्यांवर चोरट्‍यांनी हात साफ केला होता. या घटनेची चोरी उघड होऊ नये म्हणून चोरट्याने घरात आग देखील लावली होती. मात्र, चोरट्यांच्या या प्रयत्नाचा भांडा फोड करून तळोजा पोलिसांच्या पथकांनी गुन्हा घडल्या नंतर अवघ्या 6 महिन्यात या चोरीचा उलघडा करून चोरी करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. चोरी करणारी ही महिला  फिर्यादी भालचंद्र कदम यांची पत्नी भावना कदम यांची विश्वासू मैत्रीण आणि शेजारीन आहे. 3 जानेवारी रोजी भालचंद्र कदम आणि भावना कदम हे काही कामा निमित्ताने मुलांना घरात सोडून बाहेर गावी गेले होते. याच दिवशी आरोपी वंदना बाविस्कर हिने भावना कदम हिच्या घरी जाऊन मुलांना जेवण बनऊन दिले. जेवण झाल्यानंतर मुले देखील घरातून बाहेर पडली. याच संधीचा फायदा घेत आरोपी वंदना हिने घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारून पळ काढला. घरात चोरी केल्या नंतर वंदनाने घराला आग लावून आग लागल्याचा बनाव केला होता. 3 जानेवारी नंतर या घटनेची महिती घर मालक यांना लागल्या नंतर या चोरी बाबत तळोजा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्या नंतर या चोरीचा तपास तळोजा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक लांडगे आणि अडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी लातुरे आणि पोलिस कर्मचारी नवनाथ पाटील, पी.एन. मिरझा यांच्या पथकांनी केला. यातील दोन आरोपींना अटक केली असून, चोरी करणारी एक महिला आरोपी आहे. या महिला आरोपी कडून सोने विकत घेणाऱ्या ज्वलर्स मालकाला देखील अटक करण्यात आली आहे. संतोष जाधव असे ज्वलर्स मालकाचे नाव आहे. आरोपी वंदनाने चोरी केल्यानंतर चोरीतील सोने या ज्वलर्स मालकला विकले होते. ज्‍वेलर्स मालकांनी हे दागीने एका फायनान्स बँकेत ठेवले होते.