Wed, Nov 21, 2018 05:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पनवेल : पालिकेचे ४२ ‘लेट लतीफ’; आयुक्तांची कारवाई

पालिकेचे ४२ ‘लेट लतीफ’; आयुक्तांची कारवाई

Published On: Sep 01 2018 12:06PM | Last Updated: Sep 01 2018 12:06PMपनवेल : विक्रम बाबर

पनवेल महानगरपालिकेत काम करणाऱ्या लेट लतीफ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई केली. या कारवाईमुळे पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्याचे यांचे धाबे दणाणले आहेत.  या कारवाईमुळे पालिकेच्या भोंगळ आणि अनागोंदी कारभाराला चाप बसेल.

पालिकेने दिलेल्या नियोजित वेळे पेक्षा अर्धा तासाहून अधिक उशीरा येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी आज कारवाईचा बडगा उगारला. यामुळे अधिकारी तसेच कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहेत. 

पालिकेत नियमित ९ वाजून ४५ मिनिटापूर्वी कामावर येणे गरजेचे असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी मनमानी करत उशिरा कामावर हजर होतात. या गोष्टीची माहिती आयुक्तांना मिळाल्या नंतर आज चक्क आयुक्तांनी ९ वाजून ४५ मिनिटांनंतर कामावर आलेल्या अधिकारी आणि कंत्राटी कामगारांना गेटवर बराच वेळ उभा केले. यावेळी कामावर उशिरा येणाऱ्या कामगारांची मला गरज नसल्याचे आयुक्त गणेश देशमुख म्हणाले.