Mon, Apr 22, 2019 04:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘बाबा’...,पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट

‘बाबा’...,पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट

Published On: Mar 22 2018 6:48PM | Last Updated: Mar 22 2018 6:50PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्याच्या ग्रामविकास  तसेच महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना बाबा गोपीमाथ मुंडे यांची उणीव भासत आहे. त्यासंदर्भातील त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी तीन फोटोही शेअर केले आहेत. 

प्रत्येक मुलीच्या जवळचे असणारे ‘बाबा’ असे दोनच शब्द त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहेत. यासोबत गोपीनाथ मुंडे यांचे रेखाचित्र आणि रडत असलेल्या लहान बाळाचा एक फोटोही जोडला आहे. पंकजा मुंडेंनी शेअर केलेल्या तिसऱ्या फोटोवर ‘I Am Constantly Aware Of Your Abcence..’ असा संदेश लिहिलेला आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायदा लागू करण्याच पाठपुरावा करत होत्या. यासंदर्भातील त्यांचे मत अगदी ठामपणे त्यांनी विधानसभेत मांडले. पंकजा मुंडे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला विरोधकांनी कडकडून विरोध केला. अखेर आज (२२ मार्च) मुख्यमंत्र्यांनीही मेस्मा कायदा लागू करण्यात येणार नसल्याची घोषणा केली. पण, सभागृहातील गोंधळ, राजकारण, आरोप प्रत्यारोप यामुळेच पंकजा मुंडे यांना बाबांची आठवण आली असल्याची चर्चा सुरू आहे.

विरोधकांमुळे सहन कराव्या लागणाऱ्या मनस्तापामुळेच पंकजा मुंडेंनी ही पोस्ट शेअर केली असल्याचा तर्क लढवण्यात येत आहे. पंकजा मुंडेंनी मात्र ही पोस्ट करण्यामागेच नेमके कारण अद्याप सांगितले नाही. 

Tags : Pankaja Munde,Gopinath Munde,Facebook,Post, Politics, BJP, Munde Family, Mumbai, Maharashtra Legislative Assembly, Girl, Father, Relationship