होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वेत महिलांसाठी पॅनिक बटन

रेल्वेत महिलांसाठी पॅनिक बटन

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:43AMमुंबई : प्रतिनिधी

यापूर्वी महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेत आरपीएफ किंवा जीआरपीच्या कंट्रोल रूमला फोन किंवा मेसेज पाठवण्याची सुविधा होती. मात्र त्याला मर्यादा होती. आता या मर्यादेवर  मात करणारे नवे तंत्रज्ञान रेल्वेने शोधून काढले आहे. रेल्वेत महिलांच्या सुरक्षेसाठी खास पॅनिक बटनची सुविधा आता लवकरच उपलब्ध होणार आहे.

प्रत्येक महिला डब्यांमधील पॅनिक बटनाचा रंग वेगळा असेल. जेणेकरून नक्की कोणत्या महिलांच्या डब्यात ही घटना घडली आहे हे सुरक्षा यंत्रणांना लगेच समजणे सोपे होणार आहे. याशिवाय महिला प्रवाशांसाठी आणखी काही बदलही लवकरच होणार आहेत. वायव्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी संजय यादव यांनी ही माहिती दिली. मुंबईच्या उपनगरात पाहता महिलांच्या डब्याचा रंग हा इतर रेल्वेच्या डब्यांपेक्षा नेहमीच वेगळा असल्याने आता उत्तर व पश्चिम भागाच्या रेल्वेतील महिलांच्या डब्यांचे रंगही वेगवेगळ्या रंगात दिसून येणार आहेत.शिवाय रेल्वेमध्ये असलेल्या महिलांच्या डब्यातील पुरुष सुरक्षारक्षकांच्या जागी आता महिला कॉन्स्टेबलांची नियुक्ती होणार आहे. सोबतच फक्त रेल्वे नाही तर रेल्वेस्थानकांवर महिलांच्या बाबतीत होणार्‍या घटना थांबविण्याकरता निर्भया फंडातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.