Wed, Sep 26, 2018 08:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघर : शिपाई भरतीवरुन स्थायी समितीच्या सभेवर बहिष्कार

पालघर : शिपाई भरतीवरुन स्थायी समितीच्या सभेवर बहिष्कार

Published On: Jan 17 2018 2:43PM | Last Updated: Jan 17 2018 2:42PM

बुकमार्क करा
पालघर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत शिपाई भरती प्रक्रिया संशयास्पद असल्याच्या कारणावरुन स्थायी समितीच्या सभेवर बहिष्कार टाकण्यात आला. जिल्हा परिषद स्थायी समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य सर्व सदस्यांनी बहिष्कार टाकला.

जिल्हा परिषदेत 80 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर भरती केल्याच्या निषेधार्थ उपोषण करण्याचा इशारा गेल्या महिन्यात सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी दिला होता. त्यांनतर भरती प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना परत पाठवण्याचा निर्णय घेऊनही त्याची अंमलबाजवणी न झाल्याने आज स्थायी समितीच्या सभेवर बहिष्कार टाकण्यात आला. यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधकसुद्धा सहभागी झाले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

No automatic alt text available.

No automatic alt text available.