Wed, Apr 24, 2019 00:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघर : व्‍हीव्‍हीपॅटमध्ये बिघाड, मतदानाला विलंब 

पालघर : व्‍हीव्‍हीपॅटमध्ये बिघाड, मतदानाला विलंब 

Published On: May 28 2018 9:31AM | Last Updated: May 28 2018 9:36AMपालघर : प्रतिनिधी

पालघर लोकसभा पोट निवडणुकीत नव्याने व्‍हीव्‍हीपॅट मशीनचा वापर करण्यात येत असताना तालुक्यातील मतदान केंद्रावर मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.त्यामुळे मतदान सुरू झाले नसल्याने मतदानाचा वेळ फुकट जात असून वेळ वाढवून मिळावा अशी मागणी केली जात आहे. 

मशीनमध्ये बिघाड होत असल्याने वेळ वाढवून देण्याबाबतही जिल्हाधिकारी अनुत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत निवडणूक आयोगाला विचारून सांगणार असल्याचे जिल्‍हाधिकार्‍यांनी सांगितले.

मशिनची सुरुवातीची दोन बटने सुरळीत चालू असून खालील तीन बटने तीनवेळा प्रेस करावी असल्याचे मतदाराचे म्हणणे आहे. कुडे(मनोर), तारापूर, या तीन ठिकाणी मशिन बंद असल्‍याने मतदारांना खोळंबा होत आहेत.