Sat, Sep 22, 2018 05:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाकिस्तानच्या आयात साखरेवरून राजकारण तापले

पाकिस्तानच्या आयात साखरेवरून राजकारण तापले

Published On: May 14 2018 1:53AM | Last Updated: May 14 2018 1:21AMमुंबई : प्रतिनिधी

पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेवरून राजकारण तापले आहे. महाराष्ट्रात पाच हजार कोटी, तर देशभरात 19 हजार कोटी रुपये ऊस उत्पादकांचे पैसे थकल्याच्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांनी पाकच्या आयात साखरेवरून सरकारला टार्गेट केले  आहे. तर सरकारी पातळीवर स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारला टार्गेट केले आहे. खा. राजू शेट्टी यांनी, पाकिस्तानने दहशतवादी पाठविले, आता साखर पाठवून देशातील ऊस उत्पादकांवरच पाकने सर्जिकल स्ट्राईक केल्याचे म्हटले आहे. 

देशात दर कमी होऊनही साखरेला मागणी नाही. अशा काळात पाकची साखर आल्यामुळे देशातील व महाराष्ट्रातील साखरेची मागणी कमी होणार असून, साखर उद्योगाची अडचण वाढणार असल्याचे म्हटले  आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, साखर उद्योगाला अडचणीत आणण्याचा हा प्रकार  असून, ज्यांनी पाकिस्तानची साखर आपल्या गोदामात ठेवली आहे, त्यांची गोदामे पेटविण्याचा इशारा दिला आहे.