Fri, Jul 19, 2019 07:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाकिस्तानात जन्म; तो ५० वर्षांनी बनणार भारतीय

पाकिस्तानात जन्म; तो ५० वर्षांनी बनणार भारतीय

Published On: Jun 03 2018 11:39AM | Last Updated: Jun 03 2018 11:39AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुबंई उच्च न्यायालयाने भारत सरकारला पाकिस्तानमध्ये जन्म झालेल्या नागरिकाने दाखल केलेल्या याचिकेवर विचार करण्याचे आदेश दिले आहेत. असिफ करादिया नावाच्या व्यक्तीला भारतातून बाहेर घालवण्याचा आदेश देण्यापूर्वी असिफच्या वकिलांनी बाजू मांडली. असिफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी हे वेगळे प्रकरण असल्याचे न्यायालयाने नमूद करत नागरिकत्व देण्यात अडचण नसल्याचे म्हटले. याबाबत मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी असिफला राजनिष्ठेची शपथ दिल्याने त्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

असिफ करादिया यांचा जन्म पाकिस्तान मध्ये झाला. जेव्हा ते भारतात आले तेव्हा त्यांचे वय खूप कमी होते. असिफ यांचे वडिल भारतीय नागरिक आहेत. त्यांचे लग्न १९६२ मध्ये पाकिस्तानचा पासपोर्ट असलेल्या महिलेशी झाला होता. लग्नानंतर १९६५ला ती आपल्या आजीकडे पाकिस्तानला गेली असताना असिफचा जन्म झाला. त्यानंतर दोन वर्षांनी १९६७मध्ये असिफला घेऊन भारतात परतली होती. तेव्हापासून असिफ व्हिसाच्या आधारावर भारतात राहत आहेत. ते आपल्या कुटुंबासोबत नागपाडा येथे राहतात. पाकिस्तानातील कराची येथे जन्म झाल्यानंतर असिफचे नाव आईकडे असलेल्या पासपोर्टवर नोंद करण्यात आले. त्यानंतर १९७२ मध्ये तो पासपोर्ट सरकारकडे जमा करण्यात आल्यानंतर भारतीय नागरिकत्व देण्यात आले होते. 

भारतातून पाकिस्तानात पाठवले जाण्याच्या भितीने असिफच्या वडिलांनी २००५ ला मुलाला भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी याचिका दाखल केली होती. तसेच त्यांनी भारतीय नागरिकत्वासाठी म्हणून २००५ मध्ये अर्ज केला होता. त्यांचे हे प्रकरण सिटिझनशीप ॲक्टच्या सेक्शन ५ अंतर्गत येते. त्यानुसार असिफ भारतीय नागरिकत्वासाठी पात्र आहेत. ज्यांच्या आई-वडिलांचा जन्म भारतात झाला आहे त्याला नागरिकत्व मिळू शकते.