Mon, Jan 21, 2019 20:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘पद्मावत’ २५ जानेवारीला प्रदर्शित

‘पद्मावत’ २५ जानेवारीला प्रदर्शित

Published On: Jan 09 2018 2:02AM | Last Updated: Jan 09 2018 2:02AM

बुकमार्क करा
मुंबई : पीटीआय

अनेक वाद आणि विविध घटकांच्या विरोधानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ अखेर 25 जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचे व्हायोकॉम 18 मोशन पिक्‍चरने जाहीर केले आहे. वादांच्या पार्श्‍वभूमीवर या चित्रपटाचे पूर्वीचे ‘पद्मावती’ हे नाव बदलून ‘पद्मावत’ ठेवण्यात आले. त्यास सेन्सॉर बोर्डानेही मान्यता दिली आहे. अर्थात या चित्रपटाची अजूनही वादातून सुटका नाही.  राजस्थान सरकारने हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतल्याचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी सांगितले. पद्मावतला सर्वात कडवा विरोध राजस्थानातूनच होत आहे.