Fri, Sep 21, 2018 04:41



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘पुढारी’कार ग. गो.जाधव अध्यासनासाठी निधी देणार

‘पुढारी’कार ग. गो.जाधव अध्यासनासाठी निधी देणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





मुंबई : प्रतिनिधी

दैनिक 'पुढारी'चे संस्थापक संपादक पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावे शिवाजी विद्यापीठात अध्यासन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही अध्यासनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल व ही अध्यासने सुरू करण्यात येतील, अशी  घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली. विद्यापीठ विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावे अध्यासन सुरू करण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. या अध्यासनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. वित्त विभागाशी यासंदर्भात चर्चा करून या अध्यासनांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल व त्यांचे कामकाज सुरू करण्यात येईल, असेही विनोद तावडे म्हणाले.
 

Tags : kolhapur, Padma Shri award winner, founder of daily pudhari G.G. Jadhav, study center in shivaji university, Vinod Tawde, fund allocation






  •