Thu, Mar 21, 2019 11:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पीएनबी घोटाळा : कल्याण ते दिल्ली व्हाया कनेक्शन 

पीएनबी घोटाळा : कल्याण ते दिल्ली व्हाया कनेक्शन 

Published On: Feb 17 2018 9:05PM | Last Updated: Feb 17 2018 9:05PMकल्याण : वार्ताहर

देशभरात गाजत असलेला पीएनबीचा ११ हजार ३९४ कोटी रुपयांचा बँक घोटाळा व घोटाळा करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी, त्याची पत्नी एमी, भाऊ विशाल आणि व्यवसायातील भागीदार व मामा मेहुल चौकसी यांच्याविरुद्ध 31 जानेवारीला सीबीआयने गुन्हा दाखल केला. नीरव मोदी त्याची पत्नी, भाऊ आणि त्याचा मामा मेहुल चौकसी सध्या फरार असून, या प्रकरणी  सीबीआयकडून चौकशी सुरु आहे.

दुसरीकडे मेहुल चौकसी यानेही याच घोटाळ्यात पीएनबीला ४ हजार ८८६ कोटी रुपयांना गंडवल्याचे समोर आले आहे. १३ फेब्रुवारी रोजीच बँकेने त्याच्या गीतांजली ग्रुप विरुद्ध तक्रार दिली होती. गीतांजली जेम्स कंपनीचे गीतांजली, नक्षत्र आणि गिल्ली असे तीन विभाग असून, डायमंडचे दागिने तयार केले जातात. मेहुल याच्या गीतांजली ग्रुप कंपनीच्या गिल्ली या कंपनीचा डायरेकटर अनियाथ नायर हा असून या प्रकरणी सीबीआयने जे आरोपी केले आहेत त्यामध्ये एक डायरेक्टर अनियाथ शिवरमण नायर याचा यांचा सुद्धा समावेश असून तो कल्याणमध्ये राहणारा आहे. त्‍याच्या राहत्या घराची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केल्याने कल्याण शहराचे नाव दिल्ली पर्यंत जोडले गेले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे .

अनियाथ नायर याने कल्याण पूर्व येथील काटेमानवली परिसरात संजीव कॉलनी येथील चाळ नंबर 2 रूम नंबर असा पत्ता दिला आहे. मात्र, एका मोठ्या कंपनीतील डायरेकटर एका चाळीत कसा राहतो हा मोठा प्रश्न उपस्थित होत होता. प्रत्यक्षात त्याने या घरात भाडेकरू ठेवले असून, अनियाथ आपल्या कुटुंबासह चिंचपाडा परिसरात सदगुरु धाम या इमारती मधील बी विग रूम नंबर 502 मध्ये राहतो. सध्या अनियाथ फरार असून, त्याच्या घरी पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. या प्रकरणी त्यांच्या कुटुंबाने बोलण्यास नकार दिला तर, सोसायटीचे चेयरमेन मंजुळा कुट्टी यांनी अनियाथ कल्याणच्या इमारतीमध्ये २००९ मध्ये रहतो. तो एका मोठ्या कंपनीत डायरेक्टर आहे याची माहिती सोसायटीच्या सदस्यांना नव्हती. इतका मोठा प्रकार झाला आणि सीबीआय त्याच्या शोधात आहे. हे माहित झाल्‍यानंतर येथील रहिवाशांना देखील धक्का बसला आहे. शुक्रवारी दुपारी सीबीआयचे पथक अनियाथ याच्या चिंचपाडा येथील घरात आले व त्यांनी चौकशी केली.