Fri, Feb 22, 2019 21:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विपुल अंबानीसह पाच अटकेत

विपुल अंबानीसह पाच अटकेत

Published On: Feb 21 2018 1:47AM | Last Updated: Feb 21 2018 1:46AMमुंबई : वृत्तसंस्था

पीएनबी घोटाळा प्रकरणात सीबीआयने फायरस्टार इंटरनॅशनलचा अध्यक्ष विपुल अंबानी याच्यासह अन्य चौघांना मंगळवारी अटक केली. 
अधिकृत स्वाक्षरीकर्त्या कविता माणकीकर, वरिष्ठ अधिकारी अर्जुन पाटील, नक्षत्र  ग्रुपचा सीएफओ कपिल खंडेलवाल आणि गीतांजलीचा व्यवस्थापक नीतेन सेठी अशी अन्य आरोपींची नावे आहेत. सोमवारपर्यंत पीएनबी घोटाळ्याशी संबंधित एकूण सहाजणांना अटक करण्यात आली होती. आता हा आकडा 11 वर पोहोचला आहे. 

विपुल अंबानी हा रिलायन्स समूहाचे संस्थापक स्व. धीरुभाई अंबानी यांचा पुतण्या आणि मुकेश अंबानी यांचा चुलत भाऊ आहे. तसेच तो नीरव मोदीच्या विश्‍वासू सहकार्‍यांपैकी एक आहे. रविवारीच सीबीआयने विपुल अंबानीची पाच तास कसून चौकशी केली होती. फायरस्टार इंटरनॅशनल या कंपनीसाठीचे आर्थिक व्यवहार विपुल अंबानीला ठाऊक होते. त्याच्या देखरेखीखालीच हे व्यवहार झाल्याचीही माहिती समोर आली आहे.