Fri, Jul 19, 2019 18:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  ‘पैसे बँकेत ठेवले तर नीरवची, घरात ठेवले तर नरेंद्र मोदींची भीती’

 ‘पैसे बँकेत ठेवले तर नीरवची, घरात ठेवले तर नरेंद्र मोदींची भीती’

Published On: Feb 15 2018 11:21PM | Last Updated: Feb 16 2018 11:18AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा प्रकरणापासून सत्‍ताधारी भाजपवर सर्वच स्‍थरातून जोरदार टीका होत आहे. शिवसेना नेते संजय राउत यांनीही आपल्‍या स्‍टाईलमध्ये भाजपवर टीका केली आहे. संजय राउत यांनी आपल्‍या ट्विटर अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्‍त्र सोडले आहे. 

वाचा : हॉलीवूडच्या अभिनेत्रींना दागिने पुरवणारा व्यापारी

पैसे बँकेत ठेवले तर, नीरव मोदींची भीती आणि घरात ठेवले तर नरेंद्र मोदींची भीती. असे  ट्विट राउत यांनी केले आहे. नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ११ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्‍याचे समोर आले आहे.

Image may contain: 1 person, text

या घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीने विजय मल्ल्याप्रमाणे देशातून पलायन केले आहे. यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विटरवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी हे पंतप्रधान मोदींसोबत दावोसमध्ये दिसले होते. त्याचा संबंध लावत राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला घेरले. 

वाचा : पीएनबीचा इतर बँकांना सावधानतेचा सल्ला
वाचा : पीएनबी घोटाळा ‘ईडी’चे छापे