Wed, Jul 08, 2020 20:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पीएमसी बँकेच्या खातेदार डॉक्टर महिलेची आत्महत्या

पीएमसी बँकेच्या खातेदार डॉक्टर महिलेची आत्महत्या

Last Updated: Oct 16 2019 1:19AM

मुंबई ः पीएमसी बँकेच्या घोटाळ्यात खात्यात अडकून पडलेले पैसे कायमचे बुडण्याच्या भीतीने आलेला ताण असह्य होऊन संजय गुलाटी यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मंगळवारी ते राहात असलेल्या ओशिवरामुंबई : प्रतिनिधी

वाधवान बिल्डरने साडे हजार कोटी रुपयांचा चुना लावल्यामुळे निर्बंधांखाली आलेल्या पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदार निवेदिता बिजलानी (49) या डॉक्टर महिलेने मंगळवारी अंधेरीतील राहत्या घरी झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या केली. 

निवेदिता यांचे पीएमसी बँकेतील खात्यात मोठी रक्कम असल्याचे समजते. आयुष्यभराची सर्व कमाई बँकेत ठेवली असताना आता त्यांनाही बँकेतून काहीच पैसे काढता येत नव्हते. आत्महत्येमागे हे एक कारण असावे का याचा शोध घेतला जात आहे. मात्र डॉ. निवेदिता यांच्या पूर्वायुष्यातील आत्महत्येचे प्रयत्न पाहता बँक बुडाल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असे ठामपणे म्हणता येत नाही. वर्सोवा पोलिसांच्या तपासातूनच काय ते स्पष्ट होईल. 

अंधेरीतील मॉर्डन टॉऊनमध्ये डॉ. निवेदिता यांचे आई-वडिल राहतात. त्यांना दोन मुले आहेत. काही वर्षांपूर्वी दुसरा विवाह केल्यापासून त्या अमेरिकेत वास्तव्यास होत्या. अलीकडेच त्या परतल्या. आई-वडिलांच्या घरीच त्या राहात. गेल्या काही महिन्यांपासून त्या मानसिक तणावात होत्या. त्यातून त्यांनी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 

मंगळवारी दुपारी त्यांनी झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला होता. बराच वेळ होऊनही त्या  उठल्या नाही, म्हणून वडिलांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. संशय येताच त्यांनी शेजार्‍यांच्या मदतीने निवेदिता यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी निवेदिता यांना मृत घोषित केले. पोलिसांनी पालकांचा जबाब नोंदवला आहे.  त्यांनीही निवेदिता मानसिक तणावात होती आणि तिचे यापूर्वी दोनदा आत्महत्येचे प्रयत्नही फसल्याचे सांगितले. 

सहाय्यक पोलीस आयुक्त भूषण राणे यांनी सांगितले की, निवेदिता यांच्या आत्महत्येची नोंद केली आहे. त्यांचे पीएमसी बँकेत खाते होते, या आत्महत्येमागे मानसिक तणाव होता की इतर कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली याचा तपास सुरु आहे.