Wed, Jul 08, 2020 20:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पीएमसी बँक घोटाळा, सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

पीएमसी बँक घोटाळा, सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

Last Updated: Oct 17 2019 1:32AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. बँकेतील खातेदारांना १०० टक्के विमा संरक्षण देण्यात यावी, अशी विनंती बिजोन मिश्रा यांनी याचिकेत केली आहे. 

देशातील पहिल्या दहा सहकारी बँकांमध्ये समावेश होणार्‍या पंजाब आणि महाराष्ट्र बँकेत झालेल्या प्रचंड घोटाळ्यामुळे रिझर्व बँकेने त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. बँकेच्या व्यवस्थापनाने एनपीए आणि कर्जवितरणासंबंधी चुकीची माहिती रिझर्व बँकेस सादर केली आहे होती. यानंतर घोटाला उघडकीस आला होता. मात्र, यामुळे बँकेतील ठेवीदार मोठे अडचणीत आले आहेत. 

बँकेच्या खातेदारांना सुरक्षा पुरविण्यात यावी आणि त्यांना १०० टक्के विम्याचे संरक्षण देण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका बिजोन मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सदर प्रकरणाची तात्काळ सुनावणी करण्याची याचिकाकर्त्यांची विनंती मान्य केली असून त्यावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे.