Mon, May 20, 2019 08:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बीग बींसह पंतप्रधानांकडून देशवासीयांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 

बीग बींसह पंतप्रधानांकडून देशवासीयांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 

Published On: Mar 18 2018 9:52AM | Last Updated: Mar 18 2018 10:24AMमुंबई : पुढारी ऑनलाईन


मराठी नवर्षाचे आज संपूर्ण राज्‍यात गुढी उभारून थाटात स्‍वागत करण्यात येत आहे. लोक ऐकमेकांच्या भेटी घेऊन मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावरूनही नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बॉलिवूडचे बीग बी अमिताभ बच्चन, अभिनेता रितेश देशमुख यांनीही आपल्‍या ट्विटर अकाउंट वरून देशवासीयांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्‍या आहेत. 

‘‘महाराष्‍ट्रीतील माझ्या बंधू आणि भगिनींना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आशा आहे की, येणारे वर्ष तुमची स्‍वप्ने आणि आकांशा पूर्ण करेल’ असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 

सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारे बीग बी अमिताभ बच्चन यांनीही आपल्‍या ट्विटर अकाउंट वरून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्‍या आहेत. ‘‘वसंत पंचमी आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा.’’असे अमिताभ बच्चन यांनी म्‍हटले आहे. 

‘‘गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना आनंदाचे ,सुख - समृद्धीचे आणि आरोग्यपूर्ण जावो.’’ अशा शब्‍दात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्‍या आहेत. 

अभिनेता रितेश देशमुश यानेही देशवासीयांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्‍या आहेत. ‘‘गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !! नववर्ष हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.’’ असे रितेशने आपल्‍या ट्विटमध्ये म्‍हटले आहे. 
 

Tags : #GudiPadwa , PM narendra Modi, amitabh bacchan, ritesh deshmukh