होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पी. व्ही. सिंधूची ड्रीम्स ऑफ प्रोग्रेस मोहीम

पी. व्ही. सिंधूची ड्रीम्स ऑफ प्रोग्रेस मोहीम

Published On: Mar 03 2018 1:47AM | Last Updated: Mar 03 2018 12:58AMमुंबइ : प्रतिनिधी

सॅनिटरी नॅपकिन निर्मिती क्षेत्रातील प्रमुख ब्रँड असलेल्या स्टे फ्री कंपनीने नुकतीच रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी निवड केली, तसेच ड्रीम्स ऑफ प्रोग्रेस (प्रगतीची स्वप्ने) या प्रसिद्धी मोहिमेची घोषणा केली. या मोहिमेद्वारे मुलींनी आपल्या मासिक पाळीदरम्यानदेखील आपल्या स्वप्नपूर्तीचा पाठपुरावा करावा यासाठी पाठबळ दिले. 

या मोहिमेबद्दल पी. व्ही. सिंधू म्हणाली, कोणत्याही मुलीच्या मनात मासिक पाळीदरम्यान असलेली भीती म्हणजे आपले संरक्षण कधीही निघून जाऊ शकते याची. त्यामुळे आपल्या स्वप्नपूर्तीच्या प्रवासात पाळी हा अडथळा आहे, असे तिचे मत बनते. मात्र ड्रीम्स ऑफ प्रोग्रेसमुळे मुलींना पुढे जाणे शक्य होणार असून त्यांना आपली स्वप्ने वास्तवात आणता येणार असल्यामुळेच मी या मोहिमेशी जोडले गेले आहे. या मोहिमेमुळे मुलींचे मनपरिवर्तन होऊन मासिक पाळीदरम्यान न खचता त्यांना प्रेरणा मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.

नेल्सनच्या आकडेवारीनुसार भारतीय सॅनिटरी नॅपकीन्सच्या बाजारपेठेची उलाढाल आता 4 हजार कोटींपर्यंत जाऊन पोपचली आहे.  शहरीकरण, मध्यमवर्गाची वाढती संख्या, जागरुकता, नोकरी करणार्‍या महिलांची वाढलेली संख्या आणि सरकारी यंत्रणा तसेच खासगी कंपन्यांनी केलेल्या शरीराच्या आरोग्याबद्दलच्या जागरुकतेमुळे येत्या काही वर्षांमध्ये सॅनिटरी नॅपकीन्सची बाजारपेठ आणखी फोफावणार आहे. तरुण मुलींपर्यंत योग्य संदेश पोचण्यासाठी सिंधू यांनी स्टे फ्री बरोबर एक जाहिरात देखील केली आहे. त्यामध्ये सिंधू यांनी मुलींना स्वप्नपूर्तीच्या प्रवासात कोणताही व्यत्यय आणू देऊ नका, विशेषत: मासिक पाळीदरम्यान. असे आवाहन केले आहे.