Thu, Jun 20, 2019 04:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'राज ठाकरेंबरोबर आघाडी झाली नाही हे आमचे दुर्दैव'

'राज ठाकरेंबरोबर आघाडी झाली नाही हे आमचे दुर्दैव'

Published On: May 22 2019 4:04PM | Last Updated: May 22 2019 5:07PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. त्यापूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी एक वक्तव्य केले आहे. निवडणुकीत राज ठाकरे यांच्याबरोबर आघाडी होऊ शकली नाही हे आमचे दुर्दैव आहे, अशी खंत पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंना बरोबर घेतलं असतं तर बर झालं असतं, असं वाटत का? असा प्रश्न चव्हाण यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पाच वर्षानंतरही मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत, असा टोला त्यांनी मारला. 

वाचा : 'नितीन गडकरी, रावसाहेब दानवेंची जागा धोक्यात'

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात एकही उमेदवार नसतानाही भाजपविरोधात एकहाती सभा घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दणाणून सोडला. राज यांच्या सभेची दखल देशपातळीवर देखील घेतली गेली. आता त्यांना बरोबर घेऊ शकलो नसल्याची खंत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. 

वाचा : शरद पवारांना माझी घुसमट सांगण्याचा प्रयत्न केला, पण...