Mon, Apr 22, 2019 03:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राष्ट्रवादीत संघटनात्मक फेरबदल

राष्ट्रवादीत संघटनात्मक फेरबदल

Published On: Aug 25 2018 1:43AM | Last Updated: Aug 25 2018 1:42AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुका पहाता प्रदेश कार्यकारिणीत फेरबदल सुरू केले आहेत. बीडमधील माजीमंत्री प्रकाश सोळंके यांना प्रदेश उपाध्यक्ष तर माजी आमदार अमरसिंह पंडीत यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूरचे मानसिंगराव उदयसिंगराव गायकवाड यांनाही प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. 

राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीची आणखी एक यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी जाहीर केली. पक्षाची सन 2018-2020 पर्यंतची पक्षातंर्गत निवडणूक होवून यापूर्वी 50 जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या होत्या. आता जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षपदाची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. मालेगाव जिल्हाध्यक्षपदी मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

उपाध्यक्ष - प्रकाश सोळंके- बीड, मोहम्मद खान-पठाण-नांदेड, अरुण लाड-सांगली, मानसिंगराव उदयसिंगराव गायकवाड-कोल्हापूर
सरचिटणीस-अमरसिंह पंडीत, बीड, सुरेश पोरेड्डीवार-गडचिरोली, राजेंद्र कोठारी-अहमदनगर, दिलीप खैरे-नाशिक,
चिटणीस- सय्यद युसुफ अली, अकोला, बंडु उमरकर, नागपूर, हरिहर भोसीकर, नांदेड, मसुद शेख ईस्माईल-उस्मानाबाद, हनुमंतराव देसाई, सांगली, विनोद हरिणखेडे, गोंदिया, बाबासाहेब पंडीतराव पाटील, कोल्हापूर, संघटक सचिव, राजेश भरत लाटकर, कोल्हापूर, अविनाश गोटमारे, नागपूर, ताजुद्दीन तांबोळी, सांगली, श्रीमती वर्षा निकम, यवतमाळ, प्रा.आण्णासाहेब नरसू क्वाणे, कोल्हापूर, युनुस शेख, गडचिरोली, डॉ.सचिन मंडलिक, मुंबई, कार्यकारिणी सदस्य-भास्करराव काळे-बुलढाणा आदी.