Wed, Feb 20, 2019 00:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिक्षकांना सुट्टीत निवडणूक कामे!

शिक्षकांना सुट्टीत निवडणूक कामे!

Published On: May 25 2018 1:24AM | Last Updated: May 25 2018 1:22AMमुंबई : प्रतिनिधी

शिक्षकांकडे अशैक्षणिक कामे सोपविण्यात येऊ नयेत, असे अनेकदा अनेकदा आदेश दिले असले तरी ऐन मे महिन्याच्या सुट्टीत कोणतीही सबब न सांगता निवडणूक कामाला शिक्षकांना पाठवावे, असे आदेश निवडणूक आयोगाने मुख्याध्यापकांना दिले आहेत. अन्यथा लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 चे कलम 32 अन्वये कारवाईचा इशाराही मुख्याध्यापकांना दिला आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षकांना कामे करण्यासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक कार्यालयाद्वारे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पत्राचा संदर्भ घेऊन मुंबईमधील शाळांना आलेल्या परिपत्रकाने शिक्षकांची झोप उडाली आहे. मुंबईसह इतर जिल्ह्यातील शिक्षकांसह कर्मचार्‍यांना निवडणुकीच्या कामासाठी तत्काळ रूजू करावे, असे परिपत्रक निवडणूक कार्यालयाद्वारे शाळांना देण्यात आले आहे. यावर हे परिपत्रक आहे की धमकीपत्रक असा जाब विचारत मुख्याध्यापक संघटनेने या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मे महिन्याची सुट्टी असल्याने अनेक शिक्षक परिवारासोबत बाहेरगावी गेले आहेत. ऐन सुट्टीत शिक्षक मतदारांना निवडणुकीची कामे करण्याचे आदेश आल्याने याला शिक्षकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.