Sat, Aug 17, 2019 16:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेना-भाजपकडून कोकणवासियांची फसवणूकः धनंजय मुंडे

सेना-भाजपकडून कोकणवासियांची फसवणूकः धनंजय मुंडे

Published On: Apr 23 2018 3:05PM | Last Updated: Apr 23 2018 3:05PMमुंबईः पुढारी ऑनलाईन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत नाणार रिफायनरीविरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली. 'नाणार प्रकल्प होणार नाही' असे त्यांनी सभेत स्पष्टपणे सांगितले. शिवसेनेने घेतलेल्या या भूमिकेवर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.

ट्विटरवरून ते म्हणाले की, नाणार प्रकल्पाबाबत सेना-भाजपा या दोघांकडूनही कोकणवासियांची फसवणूक सुरू आहे. नाणार भूसंपादनाबाबत १८ मे २०१७ ची अधिसूचना रद्द करण्याची सुभाष देसाई यांची घोषणा म्हणजे फार्स आहे. अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया मंत्र्यांना माहीत नाही का? ही कारवाई झाली आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

नाणार मधील भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याबाबत सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती का? कॅबिनेटमध्ये याचा निर्णय झाला आहे का? हा प्रकल्प नाणारमध्ये येणार हे माहीत असतांना आजपर्यंत शिवसेना आणि त्यांचे मंत्री गप्प का बसले? असा सवाल त्यांनी केला.  

दिल्लीमध्ये कोणाची पत आहे आणि कोणाची नाही हे माहित नाही पण भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची जनतेच्या मनातून पत मात्र उतरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच कोकणवासियांच्या सोबतच आहे, नाणार बाबत जनभावना लक्षात घेवूनच निर्णय झाला पाहिजे असे ते म्हणाले.

Tags : Opposition Leader, Maharashtra Legislative Council, dhanajay munde, comment, bjp-shivsena,  nanar refinery