Fri, Sep 21, 2018 04:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुलेट ट्रेनला जमिनी देण्यास विरोध!

बुलेट ट्रेनला जमिनी देण्यास विरोध!

Published On: May 18 2018 1:43AM | Last Updated: May 18 2018 1:24AMमुंबई : प्रतिनिधी

आदिवासीच्या जमिनी हस्तांतरित करून श्रीमंताचे चोचले पुरविणार्‍या मोदी सरकारच्या बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टला आदिवासी एक इंचही जागा देणार नसल्याचा निर्धार करत शकडो आदिवासींनी गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. यावेळी पालघर, बोयसर आणि डहाणू येथून आलेल्या आदिवासींनी भूमी अधिकार आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांच्या नेतृत्वाखाली राज्य आणि केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. 

आदिवासीच्या जमिनी जावू नये म्हणून काही महिन्यापूर्वीच राज्यपालांनी तसे नियम केले होते. परंतु पेसा कायद्यानुसार वाटाघाटी करता येत असल्याने त्यांच्या जमिनी घेण्याच्या कायद्यावर त्यांनी स्वाक्षरी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी यावेळी केला. बुलेट ट्रेनचा सर्वसामान्यांना काहीच उपयोग होणार नाही, असे त्या म्हणाल्या.