Wed, Feb 20, 2019 18:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वेचे ऑनलाईन तिकीट 12 रुपयांनी महागले

रेल्वेचे ऑनलाईन तिकीट 12 रुपयांनी महागले

Published On: Jul 25 2018 1:57AM | Last Updated: Jul 25 2018 1:41AMमुंबई : प्रतिनिधी

रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट दरासाठी प्रवाशांना 12 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. मेक माय ट्रीप, पेटीएम किंवा तत्सम वेबपोर्टलद्वारा तिकिट बुकिंग करणार्‍या व्यक्तींना हा चार्ज भरावा लागणार आहे. अशा वेब पोर्टलद्वारे पेमेंट करणार्‍या कंपन्यांना 12 रुपये कर अदा केल्यानंतरच रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

आयआरसीटीसीद्वारे रेल्वे तिकीट बुकिंग करण्यात येते. मात्र, आयआरसीटीसी हा रेल्वे विभागाचाच एक भाग आहे. त्यामुळे यापूर्वी आयआरसीटीसी अशा कंपनींकडून वर्षाला ठराविक रक्कम घेत होती. मात्र, आता आयआरसीटीसीचा आयपीओ क्रमांक येणार आहे. त्यामुळेच या कंपन्यांकडून एका तिकीट बुकिंगसाठी 12 रुपये अतिरिक्त रक्कम घेण्यात येईल. पण, रेल्वेच्या या नव्या नियमामुळे मेक माय ट्रीप किंवा तत्सम कंपन्या नाराज झाल्या आहेत. तसेच या अतिरिक्त 12 रुपयांच्या शुल्कामुळे आम्ही आयआरटीसीच्या स्पर्धेत टिकणार नसल्याची खंतही कंपन्यांकडून व्यक्त होत आहे. 

या अतिरिक्त रकमेपासून सुटका हवी असल्यास प्रवाशांनी आयआरटीसीच्या वेबसाईटवरुन तिकिटांचे बुकिंग करावे. तसेच रेल्वे स्थानकातील तिकीट काऊंटरवर जाऊनही तिकिटाचे बुकिंग करता येऊ शकते.