Thu, Apr 25, 2019 18:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गाेवा : मोठ्या लाटेत एक युवक गेला वाहून

गाेवा : मोठ्या लाटेत एक युवक गेला वाहून

Published On: Jun 18 2018 7:31PM | Last Updated: Jun 18 2018 8:25PMपनवेल : विक्रम बाबर 

गाेवा येथील सिकेरी सागरी किनाऱ्यावर पावसाचा आंनद लुटण्यासाठी आलेल्या तीन युवकांना हा आंनद चांगलाच महागात पडला आहे. समुद्राच्या दगडावरून बसलेला असताना अचानक आलेल्या लाटेत एक युवक वाहून गेल्याची घटना घडली.  दिनेश कुमार रंगनाथ असे या युवकाचे नाव आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पावसाळी पर्यटनासाठी गोव्यातील विविध समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी होत आहे. सिकेरी सागरी किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली होती. काही युवक या किनाऱ्यावर बसून सेल्फी आणि लाटांचा आनंद घेत होते. याचवेळी अचानक आलेल्या लाटेत हे तिघेही युवक वाहत जात होते. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून यातील दोघे जण बचावले. तर लाटेत एकजण वाहून गेला.