Wed, Jul 17, 2019 18:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अनाथ मुलांना नोकरीत एक टक्‍का आरक्षण

अनाथ मुलांना नोकरीत एक टक्‍का आरक्षण

Published On: Jan 18 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 1:56AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

अनाथ मुलांना त्यांचा संस्थेतील कालावधी संपल्यानंतर खुल्या जगात वावरताना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांचा प्रवर्ग निश्‍चित नसल्याने शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती आणि लाभांपासून वंचित रहावे लागत असल्याने त्यांचे पुनर्वसन आणि भवितव्य सुरक्षित करण्यासाठी खुल्या प्रवर्गात एक टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.अनाथ मुलांना कोणतीच जात नसल्याने चांगले शिक्षण घेऊनदेखील त्यांना नोकरीची पुरेशी संधी मिळत नाही. त्यामुळे त्यांना बर्‍याचवेळा आर्थिक व सामाजिक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. अनाथालयातून बाहेर पडल्यावर पुढे नोकरी व व्यवसायात येणार्‍या अडचणींचा विचार करता राज्यातील अनाथ मुलांसाठी विशेष प्रवर्ग तयार करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

एमपीएससी उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळालेल्या अनाथ अमृता करवंदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. एमपीएससीमध्ये यश मिळूनही अनाथ असल्याने अमृता नोकरीपासून वंचित राहिली होती. अमृतासारख्या मुलांचे आयुष्य सुकर व्हावे, यासाठी अनाथ मुलांसाठी जातीमध्ये वेगळा प्रवर्ग तयार करण्याचे आश्‍वासन दिले होते.