Tue, Jun 18, 2019 23:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इंटरनेट वापरणार्‍या तिघांपैकी एक बालक

इंटरनेट वापरणार्‍या तिघांपैकी एक बालक

Published On: Dec 18 2017 2:38AM | Last Updated: Dec 18 2017 1:31AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तके वाचणार्‍यांची संख्या घटत चालली असतानाच कोणत्याही समस्येची उकल शोधून काढण्यासाठी सर्वत्र इंटरनेटचा वापर सर्वाधिक होत असल्याचे ‘युनिसेफ’च्या अहवालातून समोर आले आहे. जगभरात इंटरनेट वापरणार्‍या प्रत्येक तीन व्यक्‍तींपैकी एका लहान बालकाचा समावेश असल्याचेही ‘युनिसेफ’ने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

‘युनिसेफ’ ही आंतरराष्ट्रीय संस्था दरवर्षी जगभरातल्या बालकांसंबंधी एखादा कळीचा विषय घेऊन त्याचा अभ्यास अहवालरूपाने सादर करते. डिजिटल विश्‍वातली बालके हा अहवालाचा विषय निवडण्यात आला होता. यावर्षीच्या अहवालाचे डिजिटल प्रकाशन नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते आणि झुबेरी आणि जयंती या बालकांच्या अनुभव कथनाने झाले.अहवालाचे प्रकाशन करताना राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, आजोबा या नात्याने मला माझ्या नातवंडांची, म्हणूनच महाराष्ट्रातल्या मुलामुलींचीही काळजी वाटते.

युनिसेफ अहवालातल्या नोंदी

90 टक्के मुले-मुली स्मार्टफोनचा वापर मित्रमैत्रिणी जोडण्यासाठी करतात
मुलांची ऑनलाईन उपस्थिती इतकी मोठी असूनदेखील, डिजिटल विश्‍वातल्या  धोक्यांपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी सुविहित व्यवस्था नाही
अर्थव्यवस्था डिजिटल होत चालली असताना, डिजिटल दरीही वाढत चालली आहे. संपूर्ण जगातल्या तरुणांचा तिसरा हिस्सा, म्हणजे 34.6 कोटी तरुण आज ऑनलाईन नाहीत