होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात ५० लाखांच्या जुन्या नोटांसह एकाला अटक

ठाण्यात ५० लाखांच्या जुन्या नोटांसह एकाला अटक

Published On: Jan 30 2018 2:17AM | Last Updated: Jan 30 2018 1:33AMठाणे : प्रतिनिधी 

ठाण्यात चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी घेऊन आलेल्या प्रीतम शरबजीत शर्मा (वय 30,रा. मिश्रा सोसायटी, पी.के. रोड, केशवपाडा मुलुंड) याला वागळे इस्टेट पोलिसांनी सापळा रचून शनिवारी सकाळी अटक केली. त्याच्याकडील 50 लाखांची जुन्या चलनातील रक्कम पोलिसांनी हस्तगत केली. 

वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांना खबर्‍याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पांचाली हॉटेल परिसरात सापळा रचला होता. प्रीतम शरबजीत शर्मा याला एका व्यक्तीने मी रिझर्व्ह बँकेत असून तुला नोटा बदलून देतो असे सांगितले होते. शनिवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास हा इसम सॅकमध्ये एक हजाराच्या जुन्या 1500 नोटा तर पाचशे रुपयांच्या 7 हजार नोटा घेऊन आला. खबर्‍याने पोलीस पथकाला इशार्‍याने दाखवताच पोलिसांनी त्याला अटक केली. 

असे सांगितले. तो कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे. पोलिसांनी त्याच्याजवळील सॅकमध्ये असलेल्या चलनातील बाद जुन्या नोटा हस्तगत करीत शर्मा याच्या विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस कायदा 124 प्रमाणे आणि सीआरपीसी कलम 155 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. प्रीतम शरबजीत शर्मा याला नोटा कोण बदलून देणार होता याचा तपास पोलीस करत आहेत.