Mon, Dec 17, 2018 15:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दीड वर्षीय मुलीचे अपहरण करून अत्याचार

दीड वर्षीय मुलीचे अपहरण करून अत्याचार

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 10 2017 12:47AM

बुकमार्क करा

भिवंडी : वार्ताहर

भिवंडीत अज्ञात नराधमाने दीड वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना मीठपाडा शेलार येथील खेमीसती डाईंगजवळ शनिवारी सकाळी उघडकीस आली. माणुसकीला काळिमा फासणार्‍या या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित चिमुरडीला उपचारासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. 

मीठपाडा येथील डाईंगलगत पार्किंग केलेल्या बोलेरो पिकअप टेम्पोत सकाळी चिमुरडीच्या रडण्याचा आवाज आल्याने टेम्पो चालकाने मुलीला जवळ घेऊन शेजार्‍यांच्या मदतीने मुलीच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीचे पालक सापडले नाहीत. त्यामुळे या चिमुरडीला तालुका पोलीस ठाण्यात स्वाधीन करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष घाटकर यांनी वैद्यकीय तपासणीसाठी तिला रुग्णालयात नेले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले. वैद्यकीय अहवालानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादंवि कलम 363, 376 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.