Mon, Jun 01, 2020 21:48
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दीड कोटीचा दुर्मीळ मांडूळ साप जप्त

दीड कोटीचा दुर्मीळ मांडूळ साप जप्त

Published On: Apr 23 2019 1:35AM | Last Updated: Apr 23 2019 1:35AM
शहापूर : प्रतिनिधी

शहापूर तालुक्यातील खर्डी वनविभागाने सुमारे दीड कोटी रुपये किमतीचा मांडूळ प्रजातीचा दुर्मीळ साप जवळ बाळगणार्‍या एकास अटक केली आहे. किरण पवार असे आरोपीचे नाव असून, ही कारवाई उपवनसंरक्षक वन्यजीव विभाग ठाणेचे अर्जुन म्हसे व  खर्डी वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केली. 

रविवारी सायंकाळी खोणीफाटा कल्याण येथे ही कारवाई करण्यात आली. किरण पवार याने औषधी पदार्थ आणि काळी जादू या कामासाठी दुर्मीळ  मांडूळ प्रजातीचा सर्प अवैधरित्या बाळगला होता. हा साप सुमारे 145 सें. मी. लांब व 18 सें. मी. गोलाईचा असून त्याचे वजन 2 किलो 49 ग्रॅम आहे. त्याची किंमत अंदाजे दीड कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली. 

आरोपी पवार यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 39 (डी), 48 (ए), 49 (ए) 51 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. वनरक्षक चेतन डिंगोरे, विठोबा सरगर, माधव कांबळे, जालिंदर गायकवाड, राम जाधव, संदीप राठोड, चंद्रप्रकाश मोर्या आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.