Tue, Jul 07, 2020 20:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत दीड कोटीचे सोने जप्‍त

मुंबईत दीड कोटीचे सोने जप्‍त

Published On: Aug 20 2018 1:49AM | Last Updated: Aug 20 2018 1:26AMमुंबई : प्रतिनिधी

बँकॉकहून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या गोल्ड बारसह करणकुमार आत्माराम, हरिशकुमार मदनमोहन चौपडा आणि अजयकुमार या तिघांना शनिवारी हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. यात दोन प्रवाशांचा समावेश असून ते बँकॉकहून दिल्लीमार्गे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते.  6 किलो 109 ग्रॅम वजनाचे सहा गोल्ड बार जप्त केले असून त्यांची किंमत 1 कोटी 67 लाख रुपये आहे.

अटकेनंतर आरोपींना रविवारी येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांत विदेशातून गोल्ड बार तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. अशा तस्करांविरुद्ध हवाई गुप्तचर विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. शनिवारी बँकॉकहून दिल्लीमार्गे मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या हरिशकुमार आणि करणकुमार या दोघांना अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर प्रत्येकी एक किलो वजनाचे सहा तर 109 ग्रॅम वजनाचे एक असे सात गोल्ड बार सापडले. हे गोल्ड बार बँकॉकहून आणल्याचे तसेच विमानतळाबाहेर असलेल्या अजयकुमार याला देणार असल्याचे चौकशीत आरोपींनी सांगितले. त्यानंतर पथकाने विमानतळाबाहेर अजयकुमारला अटक केली. त्यांच्याविरुद्ध सीमा शुल्क कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.