Thu, Nov 15, 2018 02:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नालासोपारा स्फोटकांप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

नालासोपारा प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

Published On: Sep 08 2018 11:55AM | Last Updated: Sep 08 2018 2:33PMमुंबई : अवधूत खराडे

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा स्फोटकांप्रकरणी आणखी एकाला बेडया ठोकल्या आहेत. अत्यंत गुप्त पद्धतीने एटीएसने ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला १२ च्या सुमारास विशेष सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र, अटक केलेल्याचे नाव समजू शकले नाही.

एटीएसने आतापर्यंत याप्रकारणी वैभव राऊत, शरद कळस्कर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि अविनाश पवार या पाच जणांना अटक केली आहे. त्यानंतर ही सहावी अटक असली तरी एटीएसने कमालिची गुप्तता पाळली आहे.