Tue, Jul 16, 2019 13:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-पुणे ब्ल्यू अँड सिल्व्हर टॅक्सी बंद होण्याच्या मार्गावर

मुंबई-पुणे ब्ल्यू अँड सिल्व्हर टॅक्सी बंद होण्याच्या मार्गावर

Published On: Jul 29 2018 1:23AM | Last Updated: Jul 29 2018 1:01AMमुंबई : प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी प्रवासी मुंबई-पुणे टॅक्सी ओनर्स असोसिएशनच्या (एमपीटीओए) ब्लू अँड सिल्व्हर टॅक्सीचा वापर करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अगदी सुखकर प्रवास करणे शक्य होत आहे. त्यामुळे या टॅक्सीला मोठ्या प्रमाणात प्रवाशांची मागणी आहे. मात्र, आता ही टॅक्सी बंद होण्याच्या मार्गावर आहे.

सध्याच्या काळात सुरू झालेल्या नव्या ओला, उबर आणि खासगी वाहनांमुळे सध्या या टॅक्सीच्या मागणीत घट होत आहे. शिवाय अनेक खासगी वाहने दादर, मैत्री पार्क ते पुणे या मार्गावर अनधिकृत खासगी प्रवासी वाहतुक अवघ्या 250 ते 300 रुपये या भाड्याने करत आहेत, याचा परिणाम ब्ल्यू अ‍ॅन्ड सिल्व्हर टॅक्सीच्या मुंबई-पुणे फेर्‍यांवर झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची अतिशय सोईस्कर ब्लू अ‍ॅण्ड सिल्व्हर टॅक्सी येत्या काळात बंद होण्याची शक्यता आहे. 1972 साली मुंबई पुणे टॅक्सी ओनर्स असोसिएशनच्या (एमपीटीओए) ब्लू अँड सिल्व्हर टॅक्सीला सुरुवात झाली. त्यावेळी एकूण 400 टॅक्सी होत्या. मात्र, आता सुरू झालेल्या ओला आणि उबर या वाहनांमुळे 400 पैकी काही 347 टॅक्सी शिल्लक राहिल्या आहेत. 

तसेच, काही गाड्यांमध्ये बिघाड झाला असल्यामुळे त्या बंद आहेत. दादर पूर्व येथून पुण्याला जाण्यासाठी या टॅक्सीचे भाडे 475 रुपये आहे. मात्र, या ठिकाणी सुरू झालेल्या खासगी वाहनांमुळे या सेवेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.